You are currently viewing पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हायमास्ट उद्घाटनाच्या प्रतिक्षेत 

पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हायमास्ट उद्घाटनाच्या प्रतिक्षेत 

उद्घाटनाचाच विषय असेल तर मनसेच्या माध्यमातून त्याचे उद्घाटन करु – शहर अध्यक्ष आशिष सुभेदार

सावंतवाडी

येथील पालिकेच्या माध्यमातून सहा ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेले हायमास्ट उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. वारंवार मागणी करून सुध्दा ते सुरू करण्यात न आल्याने नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान हे हायमास्ट पालिका प्रशासनाने तात्काळ सुरू करावेत, अन्यथा उद्घाटनाचाच विषय असेल तर मनसेच्या माध्यमातून त्याचे उद्घाटन करु, असा इशारा शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याकडुन देण्यात आला आहे.
शहरात पालिकेच्या माध्यमातून मोक्याच्या आणि वर्दख असलेल्या ठिकाणी हे हायमास्ट उभारण्यात आले आहे. यात उपरलकर देवस्थान, पंचायत समिती कॉर्नर, खासकीलवाडा, पाटणकर घर, शासकीय विश्रामगृहाजवळ, मिलाग्रीय हायस्कुलच्या मागे अभिषेक टॉवर समोर जेणे करुन त्या ठिकाणी जाणार्‍या-येणार्‍या लोकांना रात्रीच्यावेळी फायदा व्हावा या मागचा उद्देश्य आहे. परंतु हे हायमास्ट उभारून महिना ते दिड महिना कालावधी उलटला. तरी अद्याप पर्यंत ते सुरू करण्यात आले नाहीत. याबाबत मनसेकडुन पालिकेला विचारले असता काम पुर्ण झाले आहे. परंतू उद्घाटन न झाल्यामुळे हे हायमास्ट सुरू करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ हायमास्ट सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा उद्घाटनाचाच विषय असेल तरी आम्ही मनसेचे पदाधिकारी स्वतः त्या हायमास्टचे उद्घाटन करू, असा इशारा श्री सुभेदार यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =