You are currently viewing ओम गणेश हाऊसिंग सोसायटीच्या मुलांनी कल्पकतेने व खूप मेहनतीने साकारली मातीपासून पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती

ओम गणेश हाऊसिंग सोसायटीच्या मुलांनी कल्पकतेने व खूप मेहनतीने साकारली मातीपासून पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती

कुडाळ :

 

तेजोमय दिवाळी आली

रांगोळीच्या रंगात सजली

पणत्यांची करुनी आरास

करू साजरी दीपावली

 

झगमगत्या दिव्यांनी सर्वांच्या जीवनात प्रकाश आणणारा , सर्व सणांचा राजा म्हणजे दिवाळी … आनंदाची उधळण करणारा हास्याचे कारंजे फुलवणारा हा दीपावली सण .

ओम गणेश हाउसिंग सोसायटी शिक्षक कॉलनी इंद्रप्रस्थ नगर कुडाळ येथे राहणाऱ्या बाल मंडळाने या सणानिमित्त अतिशय सुरेख आकर्षक असा मातीचा पुरंदर किल्ला तयार केला . हा किल्ला तयार करण्यासाठी या मुलांनी खूप मेहनत घेतली . आसपासच्या परिसरातून त्यांनी कुदळ , फावडे , घमेले यांचा वापर करत स्वतः माती खणणे ती घमेलेत किंवा पोत्यात भरणे व सायकलने इमारतीपर्यंत आणणे ,छोटे दगड गोळा करणे अशी अनेक कष्टाची कामे स्वतः केली.या मुलांचेआई-वडील नोकरदार . शहरात इमारतीत राहिलेल्या या मुलांना मातीत काम करण्याची फारशी सवय नाही . मातीचा किल्ला बनवताना माती मळणे , त्यापासून भिंती उभारणे. बुरुज बांधणे अशी अनेक कामे हे छोटे दोस्त स्वयंप्रेरणेतून स्वतः करत होते . त्यांच्या आनंदाला उत्साहाला उधाण आले होते . सृजनशीलता , कल्पकता , नाविन्यता असे अनेक सुप्त गुण या मुलांच्या अंगातून बाहेर पडत होते . तहानभूक विसरून तासनतास ही मुले किल्ला करण्यात गढली होती . किल्ल्याची तटबंदी बुरुज तसेच लोकांची वस्ती , त्यांची घरे विहिरी , शेती यासारख्या अनेक गोष्टी या मुलांनी कल्पकतेने दाखवल्या आहेत . गडावर असणारे मंदिर शिवलिंग , सिंहासनावर विराजमान झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि गडावर पहारा देणारे शिवरायांचे शूर मावळे या सर्व गोष्टी दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न या बालचमुंनी केला आहे .

किल्ला बांधण्याच्या या उपक्रमात स्वराज वअभ्यंग मसुरकर , शमिका व गार्गी आजगांवकर , रिया व विनय परब , दुर्वांक गावडे ,शौर्या व गणराज वारंग , वेदांत व शर्वील वरुटे . यश व आदिश जाधव , नुपुर व गोजिरी कर्पे , काव्या व दिव्या लाड , छोट्या दोस्तांमध्ये समर्थ तस्मयी आध्या या सर्व बाल कलाकारांनी मेहनतीने व कल्पकतेने पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..🏍️🏍️*

 

*Advt Link👇*

————————————————-

🏍️ *गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..* 🏍️

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME – फक्त रु. 999/- डाऊनपेमेंटमध्ये..*💥

 

👉 अधिक एक्सचेंज बेनिफिट

 

👉 फ्लिपकार्ट बुकिंगवर ही कॅश डिस्काउंट 💷

 

👉 5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास…😇

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 2 =