You are currently viewing १० मे रोजी वेंगुर्लेमधील आसोलीत श्री देव नारायण मंदिराचा वर्धापन दिन सोहळा..

१० मे रोजी वेंगुर्लेमधील आसोलीत श्री देव नारायण मंदिराचा वर्धापन दिन सोहळा..

 

वेंगुर्ले :

तालुक्यातील आसोली गावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १० मे रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्या निमित्त मंदिरात सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्धापन दिन सोहळा निमित्त सकाळी ८ वाजता श्री देवनारायण पंचायतन देवतांचे हस्ते शुभारंभ, ९ वाजता सग्रह सवास्तू लघु विष्णू याग धार्मिक विधी, दुपारी १ वाजता श्रींची महारथी, २ वाजता महाप्रसाद, ७ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा आणि रात्री १० वाजता आसोली गावातील दशावतरी कलाप्रेमी यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व इतर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी, असोली, समस्त गावकरी, मानकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा