You are currently viewing सिंहगड खोऱ्यात तीन दिवस वणवा;  वनसंपत्तीचे नुकसान

सिंहगड खोऱ्यात तीन दिवस वणवा; वनसंपत्तीचे नुकसान

खडकवासला : घेरा सिंहगड घाट रस्त्याच्या डोंगराला रविवारी वणवा लागला होता. वन विभागाने तो विझविला. दरम्यान, शुक्रवारी रात्री आर्वी गावाच्या बाजूने वणवा लागला तो शनिवारी सकाळी डोणजे, घेरा सिंहगड हद्दीवरील सिताबाईच्या दऱ्यात पसरला होता. असे मागील तीन दिवस सिंहगडाच्या लगतच्या डोंगर परिसरात वणवा लागत आहेत.

घेरा सिंहगड गावाच्या आतकरवाडीतील पूर्वेच्या डोंगराला रविवारी सकाळी साडेअकरा-बारा वाजण्याच्या सुमारास वणवा लागला होता. वन विभागाने तो विझविला.

पुन्हा एक वाजता वणवा लागल्याने तो विझविण्यासाठी ते दुपारी चार वाजता तेथे गेले होते शुक्रवारी आर्वी गावाच्या बाजूने वणवा लागला. तो शनिवारी दुपारपर्यंत सुरूच होता. दोन-तीन दिवस वणवा विझविण्यासाठी वन विभागाची धावपळ झाली, असे वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी सांगितले.शुक्रवारी आर्वी गावाच्या बाजूने वणवा लागला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − six =