You are currently viewing कशेडी घाटात भीषण अपघात

कशेडी घाटात भीषण अपघात

तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक

रत्नागिरी

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका मालवाहू ट्रकला भीषण अपघात झालाय. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल १५० फूट दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीरित्या जखमी झाला असून त्याला तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, ट्रक अंदाजे १५० फूट दरीत कोसळला. हा ट्रक आंध्र प्रदेशातील रोहा MIDC मध्ये क्लोरीन गॅसचे सिलेंडर घेऊन हा ट्रक जात होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 6 =