You are currently viewing कलमठ ग्रामस्थांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार

कलमठ ग्रामस्थांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार

बिडीयेवाडी पुला साठी ८ कोटी तर पर्यटन विकास मधून कलमठ गावातील कलेश्वर मंदिर गार्डन साठी १ कोटी मंजूर.

 

माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांचे प्रयत्न.

 

कणकवली :

कलमठ गावातील विकास प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालक मंत्री रवींद्र चव्हाण कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचे कलमठ ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संदिप मेस्त्री , उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी आभार मानले आहेत. माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांनी पुल व गार्डन साठी यशवी पाठपुरावा केला.कलमठ गावातील रुही कॉलोनी रस्ता ७२ लक्ष, बीडयेवाडी रस्ता ४० लक्ष, बाजारपेठ रस्ता ५० लक्ष, गजानन महाराज मंदिर ते बाजारपेठ १५ लक्ष, गावडे वाडी स्मशान शेड ५ लक्ष, लांजेवाडी शांतादुर्गा नगर रस्ता १५ लक्ष, कुंभारवाडी गणेश मंदिर सभामंडप ५ लक्ष, गावडेवाडी सभामंडप ५ लक्ष, बाजारपेठ शाळा रस्ता १० लक्ष, लांजेवाडी स्मशानभूमी रस्ता वा कंपाऊंड १६ लक्ष, बँक कॉलोनी रस्ता ७ लक्ष, बँक कॉलोनी सभामंडप ५ लक्ष,दळवी कॉलोनी रस्ता ५ लक्ष, सुतारवाडी रस्ता ७ लक्ष, कुंभारवाडी रस्ता ५ लक्ष, नाडकर्णी नगर रस्ता १० लक्ष, बौद्धवाडी ओपन जिम ८ लक्ष, गोसावीवाडी स्मशान भूमी बैठक व्यवस्था ५ लक्ष, गावडेवाडी ओम् गणेश कॉलोनी ५ लक्ष व इतर विकास कामांसाठी विविध योजनेतून कोट्यवधी निधी मंजूर झाला असून त्याच्या निविदा प्रक्रिया देखील पार पडल्या आहेत. येत्या काही दिवसात गावातील सर्व मंजूर विकासकामं पूर्ण होणार आहेत अस सरपंच संदिप मेस्त्री प्रसिध्दी पत्रकात म्हणाले. गावातील शाळा, अंगणवाड्या, स्वच्छ पाणी, महिलांसाठी सनेतरी पॅड व्यवस्था अश्या अनेक विकासात्मक काम करत असताना गावातील रस्ते रुंदीकरण साठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कलमठ ग्रामपंचायत कार्यालय आयएसओ देखील सर्व सहकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या साथीने शक्य झाले असल्याचे संदिप मेस्त्री म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + sixteen =