You are currently viewing घावनळे जि.प.मतदारसंघात विविध विकास कामांची उदघाटने व भूमिपूजने

घावनळे जि.प.मतदारसंघात विविध विकास कामांची उदघाटने व भूमिपूजने

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कामांचा शुभारंभ

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्न्नांतून घावनळे जि.प.मतदारसंघात मंजूर झालेल्या विविध विकास कामांची उदघाटने व भूमिपूजने आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रलंबित असलेली विकास कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
यामध्ये शिवापूर मुख्य रस्ता ते गाव्हाळ रस्ता , शिवापूर मुख्य रस्ता ते श्री. नारायण राऊळ यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता,शिवापूर लिंगेश्वर मंदिर येथे साकव, वसोली शेडगेवाडी रस्ता हि कामे पूर्ण झाली असून या कामांचे उदघाटन करण्यात आले.
तर वसोली ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे , वसोली खालचीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,उपवडे – साकिर्डे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,आंजिवडे सातेरी मंदिर सुशोभीकरण करणे, पुळास धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, कालेली बंगलेवाडी येथे विहीर बांधणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी शिवापूर येथे जि.प. सदस्य राजू कविटकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, विभाग प्रमुख रामभाऊ धुरी, सुधीर राऊळ, सरपंच यशवंत कदम, मनोज राऊळ, आनंद राऊळ, मंजिता कदम , वर्षा साळगावकर , मधुकर राऊळ, जयेंद्र झिमने, महेंद्र राऊळ, पांडुरंग राऊळ, सुरेश बोभाटे ,राजाराम पालकर, बाबू सावंत, सीताराम चव्हाण.
वसोली,उपवडे,आंजीवडे,साकिर्डे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, सदस्य निवास कारुडकर, प्रियांका परब, सुरेखा डांगी, दीक्षा तवटे, मीनाक्षी राऊळ, पुळास येथे सरपंच आत्माराम सावंत, दशरथ सावंत, गणपत सावंत, विलास सावंत, रोशन सावंत, नारायण धुरी, गोठोस येथे सुहास सावंत, शिवाजी पवार, नाथा मेस्त्री, रवी मेस्त्री, सानिका डिगे आदींसह शिवसैनिक व कालेली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 5 =