You are currently viewing यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आज चौथी राष्ट्रीय परिषद

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आज चौथी राष्ट्रीय परिषद

इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे सहकार्य

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आज चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ‘नॉव्हेल ट्रेंडस फार्मास्युटिकल रीसर्च’ हा या परिषदेचा मुख्य विषय असून देशभरातून सुमारे 650 विद्यार्थी व शिक्षक या परिषदेचे करता उपस्थित राहणार आहेत.
औषधनिर्माण क्षेत्रातील चालू घडामोडीचा आढावा घेणे आणि त्याच निमित्ताने येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्येशानेच या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फार्मसी क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यक्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांत करण्यात आले असून, प्रथम सत्रांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन फार्मास्युटिकल असोशियन (आय. पी. ए., महाराष्ट्र राज्य शाखा)चे विभागीय प्रमुख-डॉ. जॉन डिसूझा तसेच शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मराठे व प्राध्यापक डॉ. राजेश नवले यांच्या चर्चासत्राचे आयोजन करणयात आले आहे.
परिषदेच्या उत्तरार्धामध्ये, दुपारच्या सत्रांत भित्तीपत्रक सादरीकरण (पोस्टर प्रेझेंटेशन) स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये भारतातील विविध राज्यातुन जसे- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात इ.ठिकाणाहुन ८० पेक्षा जास्त भित्तीपत्रक सादरीकरण होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे काही संशोधक उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.विनोद मुळे, डॉ.रोहण बारसे, प्रा.सत्यजित साठे, प्रा.तुषार रुकारी, प्रा.रश्मी महाबळ यांची समिती मेहनत घेत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा