You are currently viewing सावंतवाडीचा आठवडा बाजार पर्यायी जागेत सुरू

सावंतवाडीचा आठवडा बाजार पर्यायी जागेत सुरू

सावंतवाडीकरांसह व्यापाऱ्यांची पसंती; १६० जणांना जागा उपलब्ध

 

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपालिकेने ठरवून दिल्यानुसार आठवडा बाजार येथील गोदामातच्या जागेत भरला. या नव्या जागेला सावंतवाडीकरांनीही पसंती दर्शविली आहे. दरम्यान यावेळी उपस्थित राहिलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य केले. त्यामुळे कोणताही वाद न होता तब्बल १६० व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तळ्याच्या काठावर भरणारा आठवडा बाजार दुसरीकडे नेण्याचे सुरू असताना आज त्याला यश आले आहे. मात्र जुने न्यायालय परिसर आणि गोडाऊनच्या परिसरामध्ये हा बाजार भरला असताना तेथे कोणताही वाद होऊ नये म्हणून पोलीस पथकही तैनात करण्यात आले. परंतु कोणताही अनुचित प्रकार न करता खेळीमेळीच्या वातावरणात व्यापाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य केले. ग्राहकांमध्ये समाधान पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा