You are currently viewing आज उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

आज उत्कर्ष शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

एस आर दळवी फाऊंडेशनचे आयोजन

शिक्षक सक्षमीकरणासाठी राज्यात कार्यरत असणाऱ्या एस. आर. दळवी फाऊंंडेशन या राज्यस्तरीय संस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळा शुक्रवारी १७ मार्च रोजी दुपारी ठीक २. ३० वाजता कुडाळ मराठा समाज हॉल कुडाळ येथे होणार आहे.
शिक्षकानी केलेल्या सर्व सामाजिक कार्याची आणि उत्तम शैक्षणिक कामाची तसेच त्यांनी समाजाप्रती केलेल्या कामगिरीसाठी दखल घेऊन शिक्षकांचा सन्मान व कौतुक कौतुक करण्यासाठी एस आर दळवी (आय) फाऊंडेशनच्यावतीने उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात फाउंडेशनच्यावतीने तीन उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, दोन जीवनगौरव पुरस्कार, दोन रायझिंग स्टार पुरस्कार आणि एक आदर्श शाळा निवडली जाणार असून कार्यक्रमाच्या वेळीच विजेते जाहीर केले जाणार आहेत. तीन उत्कृष्ट शिक्षकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व नॉमिनेशन केलेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला एस. आर. दळवी फाऊंंडेशनच्या संस्थापक सीता दळवी आणि रामचंद्र उर्फ आबा दळवी, सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, कुडाळचे तहसिलदार अमोल पाठक, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यास येणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आदित्य बिर्ला यांच्यातर्फे फायनान्शियल लिटरसी या विषयावर प्रशिक्षण तसेच त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच या पुरस्कार सोहळ्यामध्ये एस. आर. दळवी फाऊंंडेशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नेहरू सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण झालेल्या ‘डिजिटल लिटरसी’ कोर्सचे प्रमाणपत्रही वितरीत करण्यात येणार आहे. तसेच देशभक्तीपर कथाकथन स्पर्धेतील विजेता ठरलेल्या शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. यावेळी डॉ. नयन भेडा हे ‘Chat GPT’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन एस आर फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश सावंत आणि इतर जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 15 =