You are currently viewing खासदार संजय राऊत यांनी माळगावातील शाळेला दिला २० लाखाचा निधी

खासदार संजय राऊत यांनी माळगावातील शाळेला दिला २० लाखाचा निधी

*खासदार संजय राऊत यांनी माळगावातील शाळेला दिला २० लाखाचा निधी*

*खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित ऍड.गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगाव या शाळेच्या सभागृहासाठी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी २० लाख रु निधी मंजूर केला आहे. खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांच्या मागणी वरून खा. संजय राऊत यांनी हा निधी दिला आहे. सभागृहाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले,विभाग प्रमुख विजय पालव,माळगाव सरपंच चैताली साळकर, उपसरपंच शशी सरनाईक, रुपेश वर्दम, शाखा प्रमुख संदीप जाधव, ग्रा. प. सदस्य राजश्री शेलार,अंकिता कासले, माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉ. संजय खोत, सेक्रेटरी तातू भोगले, शालेय समिती अध्यक्ष अरुण भोगले, मुख्याध्यापक उदय जोशी, युवासेना विभाग प्रमुख राहुल सावंत, युवासेना उप विभाग प्रमुख आयवान फर्नांडिस चंद्रकांत माळकर संचालक महादेव सुर्वे, दाजी वंजारे, सुधीर पडेलकर, किशोर कासले, किरण नरे,भाऊ परब,सुधीर पडेलकर, उत्तम परब,दीपक भोगले व माळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा