You are currently viewing जिल्ह्यातील खरीप २०२० साठी धान उत्पादकतेच्या प्रमाणात एकरी ९ते १०क्विंटल ने वाढ…

जिल्ह्यातील खरीप २०२० साठी धान उत्पादकतेच्या प्रमाणात एकरी ९ते १०क्विंटल ने वाढ…

सतिश सावंत यांच्या पाठपुरवठ्या यश;शेतक-यानी व्यक्त केले समाधान

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात धान उत्पादकतेच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.खरिप हंगाम २०२०-२१मध्ये हे प्रमाण ४०ते ५० क्विंटल असुन शासन पोर्टलवर हे प्रमाण कमी असल्याने (एकॆरी ८ते९क्विंटल)शेतक-यांना त्यांच्याकडील भात विक्री करण्यास मोठी अडचण निर्माण होत होती. या बाबत योग्य शहनिशा करण्यात यावी अशीही विनंती श्री सावंत यांनी पत्राद्वारे कृषि अधिका-यांकडे केल्यानंतर जिल्ह्यातील खरीप २०२० साठी धान उत्पादकतेच्या प्रमाणात एकरी९ते* १०क्विंटल ने वाढ करण्यात आली असुन ती एकरी आता १७ते २० क्विंटलने वाढ करण्यात आल्याने जिल्हा बँकेचे अध्यश सतिश सावंत यांच्या पाठपुरवठ्या अखेर यश मिळाले आहे. एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतक-यांकडील भात खरेदी मधील अडचण दुर होईल तरी सदरचे प्रमाणपत्र मार्केटिंग अधिकारी यांना देण्यात यावे अशी विनंती जिल्हा बँकेचे अध्यश,जि.प.चे माजी गटनेते सतिश सावंत यानी कृषी अधिकारी, कृषी विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती जिल्ह्यात धान उत्पादकामचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.खरिप हंगाम २०२०-२१मध्ये हे प्रमाण ४०ते ५० क्विंटल असुन शासन पोर्टलवर हे प्रमाण कमी असल्याने (एकॆरी ८ते९क्विंटल)शेतक-यांना त्यांच्याकडील भात विक्री करण्यास मोठी अडचण निर्माण गोत आहे.तरी या बाबत योग्य शहनिशा करण्यात यावी अशीही विनंती श्री सावंत यांनी पत्राद्वारे केली होती अखेर सतिश सावंत यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरिप २०२० मधील भात पिकाची उत्पादकता भात पिकाखाली एकुण ५५७४० हेक्टरी शेत्र असुन भाताचे आलेले उत्पन्न हेक्टरी ४४०८ क्विंटल एवढे आहे.या उत्पादकतेनुसार जिल्ह्यात अंदाजे २,४५,७०२ मे.टन भाताचे उत्पादन होणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + three =