You are currently viewing खासदार विनायक राऊत यांचे दहा वर्षात योगदान काय?

खासदार विनायक राऊत यांचे दहा वर्षात योगदान काय?

दीपक केसरकर यांचा सवाल

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा खासदार हा महायुतीचाच असणार असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर कबुलायतदार गांवकर जमिन वाटपाचा निर्णय आम्ही घेतला असून त्याच वाटप करण्यात येणार आहे. या प्रश्नांत लक्ष घातलं नव्हतं म्हणणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षांत किती लक्ष घातलं ? खासदार असताना त्यांनी केलं काय ? असा सवाल करत दीपक केसरकर यांनी खा.राऊतांवर पलटवार केला. दरम्यान, रविवारी पोंभुर्लेत होणाऱ्या ‘पुस्तकांच गाव’ व उभादांडा येथील ‘कवितांच गाव’ उपक्रमाच्या शुभारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केलं.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, एक-दोन दिवसात लोकसभेच्या जागा जाहीर होतील. जो महायुतीचा उमेदवार असेल त्याला आम्ही भरघोस मतांनी निवडून आणू. राज्यात महायुती घट्ट असून ४८ पैकी ४७ खासदार हे युतीचे असतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील महायुतीच्या प्रचारासाठी येतील अस ते म्हणाले.

सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कबुलायतदार गांवकर जमिन वाटपाचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासंदर्भात वन सचिवांसोबत महत्त्वाची बैठक देखील पार पडली. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठीची चर्चा यावेळी झाली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी वन खात्यास प्रस्ताव पाठवल्यानंतर वन जमिन वाटत होईल. त्यामुळे आंबोलीतील मुख्य प्रश्न सुटेल.असे ही केसरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =