You are currently viewing देवगड खाडीपात्रात पडून खलाशाचा मृत्यू…

देवगड खाडीपात्रात पडून खलाशाचा मृत्यू…

देवगड खाडीपात्रात पडून खलाशाचा मृत्यू…

देवगड

येथील बंदरात मासेमारी करत असताना तोल जाऊन समुद्रात पडल्यामुळे खलाशाचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी ७ वाजता घडली. दीपक कृष्णा मुळये ( रा. हुबंरठ, ता. कणकवली ) असे त्याचे नाव आहे.

याबाबत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेची फिर्याद ज्योती प्रकाश पवार यांनी देवगड पोलिस स्थानकात दाखल केली आहे.

दीपक मुळये हे दाऊद सोलकर यांच्या अलनाहीद- १ या नौकेवर नोकरी करीत होते. २९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास ते नापत्ता झाले, त्यांचा मृतदेह १ मार्चला सकाळी आढळून आला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =