You are currently viewing ७ ऑगस्ट रोजी साटेली- भेडशी येथे सूर्यनमस्कार स्पर्धा

७ ऑगस्ट रोजी साटेली- भेडशी येथे सूर्यनमस्कार स्पर्धा

दोडामार्ग :

 

सद्गुरु समर्थ राऊळ महाराज सेवा ट्रस्ट साटेली- भेडशी, योग संगम समिती साटेली- भेडशी व ओम नित्य दिव्य योगाश्रम बेतोडा गोवा यांच्या विद्यमाने सूर्यनमस्कार स्पर्धा ७ ऑगस्ट रोजी साटेली- भेडशी येथील परमपूज्य सद्गुरु राऊळ महाराज स्मारक मंदिरात होणार आहे. १६ ते २३ जुलै या कालावधीत या स्पर्धेसाठी ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल व निवड झालेल्या मुलांची ७ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष स्पर्धा होईल. स्पर्धेत भाग घेऊन इच्छुक असणाऱ्या मुलांनी श्याम गोवेकर व मनोज नाईक यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा