You are currently viewing डिचोली (गोवा) येथील शांतादुर्गा मंदिरात नवा सोमवार उसव

डिचोली (गोवा) येथील शांतादुर्गा मंदिरात नवा सोमवार उसव

डिचोली गोवा:- 

श्री शांतादुर्गा देवस्थान ट्रस्ट गावकरवाडा डिचोली गोवा येथील देवी श्री शांतादुर्गा नवा सोमवार उत्सव सोमवारी 21 डिसेंबर ला मोठ्या थाटामाटात धार्मिक विधी नुसार देवी श्री शांतादुगेच्या मंदिरात साजरा होत आहे.
त्या निमित्त सकाळी देवी श्री शांतादुगेला महाअभिषेक, लघुरुद्र, आरती व तीर्थप्रसाद त्यांनतर सर्व भाविकांना देवीची भक्ती रूपाने सेवा करण्याची संधी रात्रौ उशिरा पर्यंत देण्यात येईल. तसेच सर्व भक्त जणांच्या उपस्थिती देवी श्री शांतादुर्गेला गाऱ्हाणे घालून देवीच्या मोठ्या नामघोषणे, जयघोषाने, व सुप्रसिद्ध, शांतादुर्गा भजनी मंडळ, भांबर्डे, तसेच हनुमान बँड पथक यांचं संगतीने व फटाक्यांच्या आतषबाजीने रात्रौ 9 वाजता पालखी मिरवणुकी ला सुरुवात होणार आहे.
रात्रौ 10 वाजता श्री देवी शांतादुर्गाच्या प्रांगणात नाट्य भक्ती भाव रंग हा गायनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक श्रीरंग भावे (पुणे) सोबत गायिका सौ. रेवा नातू (पुणे) आणि निवेदिता नेहा उपाध्येय कार्यक्रम सादर करतील व पहाटे 1.30 वाजता श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम हे चांदणे स्वरांचे होणार आहे. गायक नितेश सावंत, गायिका समीक्षा भोबे काकोडकर, निवेदक संजय सालेलकर सहभागी होतील. त्यानंतर पालखी मंदिरात प्रवेश केल्या नंतर आरती, तीर्थप्रसाद. व गाऱ्हाणे होउन उत्सवाची सांगता होईल. त्याचप्रमणें डिचोली कोमुनिदाद सभा मंडपात राज्यस्तरीय खुल्या गटात रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
रविवारी सायंकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत व सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत ही स्पर्धा होईकोमुनिदाद 3000, द्वितीय 2000, तृतीय 1000 व 4 उत्तेजनार्थ 500 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. नौकायान व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम गौळणकाल्या दिवशी कोमुनिदाद सभा मंडपात 31 डिसेंबर ला 5.30 वाजता होणार आहे. रांगोळी स्पर्धेसाठी अर्जुन श्रीरंग परब डिचोली फोन न. 2362664/6420064652, राजाराम मंगेश परब 9422059425 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी 30 डिसेंबर ला देवी शांतादुर्गाच्या पारंपरिक कालोत्सव सकाळी महाभिषेक, सप्तशती पाठवचन, आरती, तीर्थप्रसाद व रात्रौ 9 वाजता मंदिराभोवती पालखी मिरवणूक त्यानंतर रात्रौ 10 वाजता श्री अष्टविनायक पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ निरवडे तालुका सावंतवाडी महान पौराणिक दणदणीत श्रवण भक्तीचा आनंद देणारा विररस युक्त दर्जेदार दिधले दान सौभाग्याचे हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. सायंकाळी 4 वाजता देवीचा गौळणकाला सादर करण्यात येईल. दशावतार नाट्य मंडळ निरवडे सादर करतील. त्यानंतर देवीची पालखी वाळवंटी नदीवर जाऊन पूजाअर्चा करून मंदीरात आण्यात येईल. त्यानंतर उत्सवाची सांगता होईल तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शांतादुर्गा देवस्थान, ग्रामस्थ, गावकर मंडळ ट्रस्ट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =