You are currently viewing तांबळडेग येथे दि. १७ ते २४ फेब्रुवारीस वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

तांबळडेग येथे दि. १७ ते २४ फेब्रुवारीस वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

देवगड –

कोकणातील सागर किनाऱ्यावरील देवगड तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले तांबळडेग गावचा वार्षिक श्री देव विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम सप्ताह मिती माघ शुद्ध आठ शके १९४५ शनिवार दिनांक १७ ते २४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रोज सात दिवस विविध विषयांवरील चित्ररथाच्या माध्यमातून देखाव्याचे सादरीकरण दाखविण्यात येणार असून पंचक्रोशीतील भजन मेळे आपली सेवा पांडुरंग चरणी देणार आहेत. सप्ताहात पहाटे पाच आणि सायंकाळी सात वाजता अशी दोन वेळा सतत सात दिवस गणपत भिवा सादये यांच्याकरवी आरती म्हटली जाईल. यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह उत्सवातील पुजारी हरिश्चंद्र आत्माराम कोचरेकर व सौ. शुभदा हरिश्चंद्र कोचरेकर या दांपत्याला मान देण्यात आला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दहिकाल्याने होणार असून रात्रौ ठिक दहा वाजता प्रहर क्रमांक तीन यांच्या सौजन्याने “चांडाळ चौकडी” हे दोन अंकी मालवणी नाट्य प्रयोग दाखविण्यात येणार आहे. तरी या मंगल धार्मिक सोहळ्यास भजन मंडळीसह उपस्थित राहून भाविकांनी आशीर्वाद घ्यावा. असे आवाहन अध्यक्ष महादेव नामदेव कोचरेकर, चिटणीस काका मुणगेकर , मुंबई समिती सचिव एडव्होकेट राज वसंत कुबल, मुंबई समिती प्रमुख गणपत भिवा सादये केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा