You are currently viewing सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिजाऊ बचतगट महासंघाची स्थापना

सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिजाऊ बचतगट महासंघाची स्थापना

रोजगार निर्मिती,मार्केटिंग,युवकांनाही बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी

सावंतवाडी

सावंतवाडी येथे जिजाऊ बचतगट महासंघ सिंधुदुर्ग ची स्थापना करण्यात आली. हा महासंघ स्थापन करण्यामागची उदिष्ट बचतगटांना उद्योगासंदर्भात प्रशिक्षण देणे, तसेच उद्योगासाठी लागणारा कच्चामाल देणे व तयार पक्कामाल खरेदी करणे.
बचतगट संकल्पना फक्त महिलांपुरती न ठेवता बेरोजगार युवकांना एकत्र करुन बचतगट स्थापन करुन त्यातून रोजगार निर्मिती करणे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्याचे मुख्य उदिष्ट या महासंघाचे असेल तसेच ग्रामीण भागातील शेतकरी पिकवत असलेल्या उत्पादनांचे मार्केटींग या बचतगटाच्या माध्यमांतुन करण्यात येईल या प्रसंगी महेश पांचाळ , अजित सुभेदार ,साक्षी गवस, अस्मिता भराडी, नेहा काष्टे , सोनम मांजरेकर, दिव्या कांबळी.
दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा व रोजगाराचा जास्तीत जास्त बचतगटांनी लाभ घ्यावा यासाठी खालील मोबाईल नंबरवर जास्तीत जास्त बचतगटांनी संपर्क साधावा. असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष महेश पांचाळ यांनी केले.

संपर्क –
साक्षी गवस 8605358977
अस्मिता भराडी 8605251590
सोनम मांजरेकर 9145159488

प्रतिक्रिया व्यक्त करा