You are currently viewing न्हावेली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा तात्काळ सुरळीत करा; ग्रामस्थांचे सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात निवेदन सादर

न्हावेली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा तात्काळ सुरळीत करा; ग्रामस्थांचे सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात निवेदन सादर

न्हावेली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा तात्काळ सुरळीत करा; ग्रामस्थांचे सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात निवेदन सादर

सावंतवाडी :

न्हावेली गावात असणाऱ्या बीएसएनएल टॉवरची वारंवार खंडित होणारी सेवा तात्काळ सुरळीत करा, अशी मागणी न्हावेली ग्रामस्थांच्यावतीने सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात करण्यात आली.

न्हावेली ग्रामस्थांच्यावतीने आज सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, विशाल गावडे, अजित न्हावेलकर, सचिन पार्सेकर, गणेश नाईक, कमळाजी नाईक, रोशन आरोसकर, राजेश धाऊसकर, रामचंद्र धाऊसकर, विजय मेस्त्री, एकनाथ जाधव, मधुकर पार्सेकर, गंगाराम नेमण, आनंद आरोंदेकर, अंकुश मुळीक, कपील धाऊसकर, प्रथमेश धाऊसकर, प्रदीप गावडे, सुरेश बोंद्रे, शरदचंद्र मोहिते, आनंद नाईक, गंगेश्वर कोचरेकर, रामचंद्र परब, रोहिदास सावळ, भरत धाऊसकर, दिलीप गावकर, निलेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या निवेदनात असे म्हटले की, न्हावेली गावात असणाऱ्या बीएसएनएल टॉवरची सेवा अजिबात सुरळीत नाही. अगदी 200 मीटरपर्यंत सुद्धा टॉवरची रेंज मिळत नाही. कॉल लागत नाहीतच नेट सुद्धा व्यवस्थित चालत नाही. तसेच न्हावेली येथे ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आदी शासकीय कार्यालये आहेत. मात्र नेट अभावी कामकाजावर परिणाम होत आहे. नेट अभावी व कॉल लागत नसल्याने मोबाईलमध्ये मारलेले रिचार्ज फुकट जात असल्याने ग्रामस्थांचे पैसे वाया जात आहेत. याबाबत वारंवार आपल्याकडे तोंडी तथा लेखी कळूनही आपल्याकडून यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्यापही करण्यात आली नाही. येत्या आठ दिवसात संबंधित टॉवरची सेवा न केल्यास न्हावेली ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य यांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर आंदोलनाचा छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − seven =