You are currently viewing राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

  सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात “राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम” दि. 3 ते 15 जुलै 2023 दरम्यानमध्ये राबविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विविध महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम मंत्री महोदयांचा फ्लॅगशीप कार्यक्रम असून प्रती तालुका किमान 1000 युवतींचा या कार्यक्रमात सहभाग असणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवतींना या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळावा यासाठी जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

बदलत्या काळानुसार महिलांची सुरक्षा हा खूप ज्वलंत विषय बनलेला आहे. मंत्रीमहोदय महिला व बाल विकास विभागाच्या आढावा बैठकीत राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निघृण हत्या व महिलांवरील हिंसाचार याबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. तसेच बदलत्या काळानुसार महिलांच्या बदललेल्या समस्या व त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याकरिता शासनस्तरावरून नियोजन करणे ही अत्यावश्यक बाब झालेली असून अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे क्रूर हिंसाचार व त्यातून त्यांची केली जाणारी हत्या हे शासनासमोरील व समाजासामोरील आव्हान ठरत आहे.

शाळकरी व  महाविद्यालयीन तरुण तरुणी यांची जीवनशैली तंत्रज्ञानामुळे खूपच बदललेली असून त्यातूनच बहुतांशी सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महिला व मुलींवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असून त्यानुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यातील सर्व विद्यापीठाअंतर्गत कार्यरत महाविद्यालीन युवतींना हिंसाचाराविरुद्ध मनोबल उंचावण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी दि. 3 ते 15 जुलै 2023 या कालावधीत “राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम” राबविण्याचा शासन निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने पारित केलेला आहे. महिलांवरील अत्याचार व गुन्हे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या कार्यक्रमांतर्गत राज्यातील युवतींना मनोबल उंचावण्यासाठी महिला व मुलींवरील हिंसाचार-संकल्पना व सद्यस्थिती यावर तज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञान व महिला, मुलींना असणारे धोके याबाबत पोलीस विभागातील सायबर सेल तज्ञ अधिकारी यांचे मार्गदर्शन तसेच सशस्त्र व निःशस्त्र हल्ला झाल्यास स्वसंरक्षणार्थ वापरता येणारी 6 मुलभूत संरक्षण कौशल्ये यांचे प्रात्यक्षिक स्वरूपातील प्रशिक्षण या बाबी अंतर्भूत आहेत. प्रशिक्षण हे तीन दिवसीय असून प्रती तालुका किमान 1000 युवतींचा या प्रशिक्षणात सहभाग अपेक्षित आहे. हा कार्यक्रम राज्य शासन पुरस्कृत असून पूर्णतः निःशुल्क स्वरुपात युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिलांवर होणारे अत्याचार व हिंसाचार यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

सध्याच्या जगात महिलांनी सुशिक्षित असण्यासोबतच सक्षम व सबल असणे देखील तितकेच आवश्यक असून महिला सबलीकरण व सक्षमीकरणाच्या विशेष हेतूने शासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सक्रीय सहभाग घेऊन सहकार्य करण्याबाबत मंत्री, महिला व बालविकास विभाग यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (संपर्क क्र. 02362 228869) येथे संपर्क साधावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा