You are currently viewing कणकवली येथे परमहंस भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ

कणकवली येथे परमहंस भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ

कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा होत आहे महोत्सव

कणकवली

असंख्य भाविकाचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी महोत्सवास १७ डिसेंबर या दिवशी भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. २१ डिसेंबरपर्यंत असणारा हा महोत्सव कोरोनाविषयीचे नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

१७ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजल्यापासून समाधीपूजन, काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व भक्तांच्या कल्याणार्थ धार्मिक विधी आणि भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान या कार्यक्रमांना ब्रह्मवृंदाच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

या वेळी परमहंस भालचंद्र संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, खजिनदार दादा नार्वेकर आदी उपस्थित होते. दुपारी आरती, भजने, सायंकाळी धुपारती, रात्री दैनंदिन आरती, असे कार्यक्रम झाले. पुढील ४ दिवस वरीलप्रमाणेच कार्यक्रम होणार आहेत. २१ डिसेंबर हा परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्यदिन आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. ‘या महोत्सवाच्या कालावधीत सर्व धार्मिक विधी होणार आहेत; मात्र महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत’, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महोत्सवास येणार्‍या भाविकांनी शासकीय नियम आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे. संस्थान परिसरात आणि समाधीस्थानी मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवून दर्शन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eighteen =