You are currently viewing बांदा पोलीस निरीक्षकांचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत…

बांदा पोलीस निरीक्षकांचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत…

बांदा पोलीस निरीक्षकांचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत…

बांदा

बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शामराव काळे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी अधिकारी सागरी सुरक्षा सिधुदुर्ग या पदी बदली झाल्याने त्यांचे जागी अप्पर पोलीस अधिक्षक यांचे वाचक म्हणून काम पहाणाऱ्या श्री. विकास बडवे यांची बांदा पोलिस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याकरीता आज बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.गुरु कल्याणकर,बांदा ग्रा. पं. सदस्य प्रशांत बांदेकर, कास सरपंच प्रविण पंडित, निगुडे माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य समीर गावडे, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, रोणापाल ग्रा. पं सदस्य योगेश केणी यांनी स्वागत व सदिच्छा भेट घेतली.
यावेळी बांदा पंचक्रोशीतील समस्यां व सलोखा राखण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. बडवे यांनी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या अडचणी,समस्या व प्रश्न जाणुन घेतले. तसेच याबाबत आपले नेहमीच सर्वतोपरी सहकार्य लाभेल असे सांगितले. आम्ही आपल्या सेवेसाठीच असुन, सर्वाच्या सहकार्याने पंचक्रोशीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात येईल व सर्व प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घातला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री. समीर भोसले यांची कुडाळ पोलीस ठाणे येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक जागी मालवण पोलीस ठाणे येथील नवनियुक्त श्री. शिवराज झंझुर्णे हे पोलीस उपनिरीक्षक पदी बांदा पोलीस ठाणे या ठिकाणी आल्याने त्यांचे स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर , बांदा ग्रा. पं. सदस्य प्रशांत बांदेकर, कास सरपंच प्रविण पंडित, निगुडे माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य समीर गावडे, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, रोणापाल ग्रा. पं सदस्य योगेश केणी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =