You are currently viewing शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेचा दहावीचा 100% निकाल

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेचा दहावीचा 100% निकाल

पणदूर :

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा या प्रशालेतून एस.एस.सी. मार्च 2022 चा निकाल 100% लागला आहे.

प्रशालेतून प्रथम क्रमांक कु. शुभम सत्यवान तिवरेकर 96.80%, द्वितीय क्रमांक कु. लोचन शंकर गोसावी 96.20%, तर तृतीय क्रमांक कु. वैभवी भास्कर गोसावी 94.00%, चौथा क्रमांक कु.राहुल संतोष जंगले 93.60%, पाचवा क्रमांक कु. तन्वी संतोष भोई 93.00% गुण पटकावले आहेत.

दहावी परीक्षेला एकूण 153 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 153 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100% लागला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्री शशिकांत अणावकर,  संस्था संचालक, प्र.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 4 =