You are currently viewing उडान महोत्सव’ च्या पथनाट्य स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश

उडान महोत्सव’ च्या पथनाट्य स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश

‘उडान महोत्सव’ च्या पथनाट्य स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश

तर वक्तृत्व स्पर्धेत देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज प्रथम

सावंतवाडी

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व लोकमान्य टिळक संचलित देशभक्त गव्हाणकर कॉलेज यांच्यावतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या ‘उडान महोत्सव 2024’ च्या पथनाट्य स्पर्धेत सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने तर वक्तृत्व स्पर्धेत देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : निबंध लेखन (सृजनशील लेखन)प्रथम -आमदार दीपक भाई केसरकर कॉलेज दोडामार्ग ,द्वितीय – पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी तृतीय- स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण, उत्तेजनार्थ -परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज विद्यालय साळगाव

वकृत्व स्पर्धा – प्रथम- देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज सावंतवाडी , द्वितीय- बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, तृतीय क्रमांक -लक्ष्मीबाई सिताराम हळवे कॉलेज दोडामार्ग ,उत्तेजनार्थ -श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी

पथनाट्य स्पर्धा— प्रथम-श्री पंचम खेमराज कॉलेज सावंतवाडी, द्वितीय -आमदार दीपक भाई केसरकर कॉलेज दोडामार्ग, तृतीय -व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ उत्तेजनार्थ – स.का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण

भित्तीपत्रक स्पर्धा -प्रथम परमपूज्य विनायक अण्ण राऊळ महाराज महाविद्यालय साळगाव, द्वितीय -डॉ. जे .बी नाईक कॉलेज सावंतवाडी ,तृतीय -व्हीक्टर डॉन्टस लाऑ कॉलेज कुडाळ, उत्तेजनार्थ- जय हिंद कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साळगाव बक्षीस वितरण मुंबई विद्यापीठाच्या एक्स्टेन्शन बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमन कुणाल जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी लोकमान्य ट्रस्ट नूतन संचालक सचिन मांजरेकर देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा