You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन आणि बांधकाम विभाग निद्रिस्त

दोडामार्ग तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन आणि बांधकाम विभाग निद्रिस्त

दोडामार्ग तालुक्यातील परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार?

दोडामार्ग

दोडामार्ग आपत्ती व्यवस्थापन व बांधकाम विभाग सुशेगात असल्याचे चित्र असुन ऐन तौक्ते वादळाच्या आपत्ती वेळी सुद्धा हीच परीस्थिती दोडामार्ग तालुक्यात पहावयास मिळाली. तौक्ते वादळात अनेक झाडे जमिनदोस्त झाली अनेक ठीकाणचे रस्ते झाडे पडल्यामुळे बंद झाले. अनेक घरांवर शासकीय इमारतीवर तसेच वीद्युत वाहीन्यांवर झाडे पडल्यामुळे तेही जमिनदोस्त झाली. मात्र या सर्व प्रकारात दोडामार्ग आपत्ती व्यावस्थापन नक्की काय करत होते. तसेच ज्या विभागाचा रस्ता मालकीचा आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभाग या कठीण परिस्थितीत कोणती भुमिका बजावत होते हख प्रश्न मात्र आनुत्तरीत राहीला.

रस्त्यावर पडलेली झाडे कोणी व कशी हटवावी हा प्रश्न अनुत्तरीत असताना दोडामार्ग पोलीस प्रशासन मात्र ग्रामस्थानच्या मदतीला धावून येत त्यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी मदतीला धावून आले.प्रसंगी झाडे कापण्यासाठी आपल्या खिशातील पैसे पोलीसांनी खर्च केले. गेल्यावर्षी ऐन लाँकडाऊन मध्ये अन्नधान्य पुरवून माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या दोडामार्ग पोलीसांनी यावेळीही तौक्ते वादळात ग्रामस्थांना मोलाची मदत करुन पुन्हा एकदा दोडामार्ग पोलीसांनी माणुस्कीचे दर्शन घडविले.

दोडामार्ग तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा कायमच वाजलेले असतात कोरोना काळ असो, पुरजन्य परिस्थिती असो तसेच वेळोवेळी येणारी आपत्ती असो दोडामार्ग मधील आपत्ती व्यावस्थापन कक्ष व संबंधित विभाग नक्की काय कार्य करतो हे शोध घेण्यासारखे असुन या काळात ग्रामस्थांना मात्र कायमच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यामुळे हा आपत्ती व्यावस्थापन कक्ष एकतर बंद करावा कींवा सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीने तो पुर्णपणे कार्यान्वित करावा अन्यथा अनेक प्रश्नांसाठी झगडणाऱ्या व आंदोलन उपाकरणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील जनतेला या आपत्तीसाठीही जन आंदोलन पुकारावे लागल्यास शासनाला याहून मोठी शरमेची गोष्ट नाही.
तसेच या तौक्ते वादळात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान केळी बागयती, माड बागायती व इतर उत्पन्नावर ऐनवेळी आलेली संक्रांत यामुळे शेतकरी हवालदित असुन घाटमाथ्यावरची परीस्थिती (आत्महत्या)कोकणातही येण्यास वेळ लागणार नाही त्यामुळे संबंधित यंत्रनेने ठोस पाऊले उचलने गरजेचे असुन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. आता तरी कृषिविभाग, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे असुन शेतकऱ्यांना त्यांची नुकसानभरपाई त्वरित मिळणे गरजेचे आहे.
पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व त्यांचे सहकारी या कोरोना काळातही अशा आपत्तीतही रस्त्यावर उतरून काम करत आहे. हे खरोखरच वाखडण्या योग्य असुन दोडामार्ग तालुक्यातही कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + five =