You are currently viewing क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिर तारीख व ठिकाणात बदल

क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिर तारीख व ठिकाणात बदल

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे दिनांक १ ते ८ जून या कालावधीत शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव हे शिबिर यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी येथे दिनांक १५ ते २२ जून २०२३ या कालावधीत होणार आहे. सर्व क्रीडा शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा.

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार, व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण २०१२ घोषित करण्यात आलेले आहे. या क्रीडा धोरणानुसार खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे.

तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्ययावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी अद्ययावत क्रीडा धोरण सन २०१२ तयार करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीसाठी दिनांक १४/०६/२०१२ च्या शासन निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजन शासन निर्णय दि. २८/०४/२०१४ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सदरचे तसेच सदर प्रशिक्षण शिबीराच्या आवश्यक त्या महितीसाठी श्याम देशपांडे, तालुका क्रीडा अधिकारी कणकवली यांना संपर्क साधावा (संपर्क क्र.९७३००१००८५)

प्रतिक्रिया व्यक्त करा