You are currently viewing एसटी विभागीय कार्यशाळेच्या स्क्रॅप यार्ड लगत आग…

एसटी विभागीय कार्यशाळेच्या स्क्रॅप यार्ड लगत आग…

एस टी कर्मचाऱ्यांचे आग विझविण्यात मदतकार्य…

कणकवली

येथील एसटी विभागीय कार्यशाळेच्या संरक्षण भिंती लगतच्या सुक्या गवत्याला आज दुपारी १२ वा. च्या सुमारास अचानक आग लागून स्क्रॅप यार्ड मधील दहा-बारा फिल्टर व एक फॅन असे साहित्य जळून १५०० रुपयाचे नुकसान झाले आहे. येथील कर्मचाऱ्यांनी लागलेली आग तात्काळ विझवून आटोक्यात आणली. कणकवली एसटी विभागीय कार्यशाळेचे मेकॅनिकल इंजिनिअर संदीप विष्णू पाटील यांनी याबाबतची खबर कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.दरम्यान या बाबतची माहिती मिळताच नगरसेवक सुशांत नाईक यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 3 =