You are currently viewing कुंदे ग्रामपंचायत वात्‍सल्‍य सामाजिक संस्‍था सिंधुदुर्ग, यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने “महिला दिनाचे” आयोजन

कुंदे ग्रामपंचायत वात्‍सल्‍य सामाजिक संस्‍था सिंधुदुर्ग, यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने “महिला दिनाचे” आयोजन

कणकवली :

 

कुंदे ग्रामपंचायत व वात्‍सल्‍य सामाजिक संस्‍था, सिंधुदुर्ग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ८ मार्च “जागतिक महिला” दिना‍निमित्‍त महिलांसाठी मोफत आरोग्‍य तपासणी शिबीराचे आयोजन व महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे कुंदे ग्रामपंचायत येथे दिनांक ०८ मार्च २०२३ रोजी आयोजन करण्‍यात आलेले आहे.

*महिलांसाठी विविध कार्यक्रम*  

सकाळी १०.०० वा. महिला दिन कार्यक्रम उद्घाटन सोहळा, सकाळी १०.३० वा. ते दु. १.३० वा. महिलांसाठी आरोग्‍य तपासणी शिबीर, दुपारी १.३० वा. ते २.३० वा. महिलांसाठी स्‍नेहभोजन, दुपारी २.३० वा ते ४.३० वा. महिलांसाठी फनी गेम्‍स, संध्‍या ४.३० वा. ते ५.०० वा कार्यक्रम समारोप, तरी कुंदे गावांतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुंदे ग्रामपंचायत, वात्‍सल्‍य सामाजिक संस्‍था सिंधुदुर्ग, यांच्‍या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − one =