You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षांच्या वेळापत्रकात बदल…

शिष्यवृत्ती परीक्षांच्या वेळापत्रकात बदल…

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( 8 वी) ही दिनांक 23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. तथापी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थई हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात येत आहेत. परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. सदर बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा