You are currently viewing न्हावेली उपसरपंचपदी विशाल गावडे यांची बिनविरोध निवड..

न्हावेली उपसरपंचपदी विशाल गावडे यांची बिनविरोध निवड..

सावंतवाडी प्रातिनिधी
अलिखित करारनुसार न्हावेली उपसरपंच प्रेमलता मसुरकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपसरपंचपदी विशाल गावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण गावाच्या सहकार्यानेच आपणांस उपसरपंचपद मिळाले असून याचा गावच्या हितासाठी उपयोग करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच विशाल गावडे यांनी सांगितले.
न्हावेली ग्रामपंचायत सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या मासिक बैठकीत विशाल गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मळेवाड शिवसेना विभागप्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य शरद धाऊसकर, सरपंच प्रतिभा गावडे, माजी उपसरपंच प्रेमलता मसुरकर, ग्रा.पं. सदस्य भावना धाऊसकर, उदय पार्सेकर, जयश्री नाईक, शिवसेना शाखाप्रमुख आनंद मसुरकर, ग्रामसेवक तृप्ती राणे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते.
कोरोनासारख्या महामारीत गावातील स्थानिक प्रशासन जबाबदारीने कार्य करत आहेत. आज गावातील ग्रामस्थांनी घेतलेल्या काळजी मुळेच आपण कोरोपासून दूर आहोत. ग्रामस्थांच्या आरोग्यासह गावातील विकास कामात तत्परतेने कार्य करणार असल्याचे, नवनिर्वाचित उपसरपंच विशाल गावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =