You are currently viewing अयोध्येतील लाईव्ह कार्यक्रम पहाण्यासाठी आमदार नितेश राणे सह वैभववाडीत राम भक्तांची गर्दी

अयोध्येतील लाईव्ह कार्यक्रम पहाण्यासाठी आमदार नितेश राणे सह वैभववाडीत राम भक्तांची गर्दी

अयोध्येतील लाईव्ह कार्यक्रम पहाण्यासाठी आमदार नितेश राणे सह वैभववाडीत राम भक्तांची गर्दी

वैभववाडी

श्री राम मंदिर मुर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे श्री दत्त मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले. अयोध्या येथे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विधीवत धार्मिक कार्यक्रम पहाण्यासाठी येथील दत्त मंदिरात लाईव्ह प्रक्षेपण लावण्यात आले होते. सदर कार्यक्रम पहाण्यासाठी आ. नितेश राणे शहरातील राम भक्त व नागरिकांमध्ये सहभागी झाले होते.

वैभववाडी येथील श्री राम उत्सव समिती व शहरवासीय यांच्या वतीने श्री. दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, सज्जनकाका रावराणे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, व्यापारी मंडळ अध्यक्ष तेजस आंबेकर, श्री. धावले, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, सुनील भोगले, श्री. मसूरकर, प्राची तावडे, यामीनी वळवी, स्नेहलता चोरगे, सुंदरी निकम, संगीता चव्हाण, संतोष टक्के, संजय लोके, मारुती मोहिते, प्रकाश माईणकर, दीपक माईणकर व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =