You are currently viewing महायुतीच्या उमेदवाराला एक लाखाच्या वर माताधिक्य देणार – राजन तेली

महायुतीच्या उमेदवाराला एक लाखाच्या वर माताधिक्य देणार – राजन तेली

महायुतीच्या उमेदवाराला एक लाखाच्या वर माताधिक्य देणार – राजन तेली

सावंतवाडी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महायुतीतील सर्व पक्षांची एकत्रित समन्वय बैठक झाली असून सर्वांनी एकत्रित प्रचार करून सावंतवाडी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला किमान एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली व शिवसेनेचे पदाधिकारी तथा सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी महायुतीची संयुक्त बैठक सोमवारी सकाळी संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, उदय भोसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी , जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, अजय गोंदावळे, अॅड. निता कविटकर, विनायक दळवी, राजू निंबाळकर, राजन रेडकर, चंद्रकांत जाधव आदींसद पदाधिकारी उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १२ एप्रिल रोजी सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचे नियोजनही या समन्वय बैठकीत करण्यात आले. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरीही वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय घेण्यात येईल तो सर्वमान्य असेल व महायुतीचा जो उमेदवार घोषित करण्यात येईल त्याचा महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट व आर पी आय व मित्रपक्ष मिळून एकत्रित प्रचार करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विकास हाच महायुतीच्या प्रचाराचा मुद्दा असणार असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना व सर्वसामान्यांसाठी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी राजन तेली म्हणाले. या मतदारसंघात निवडणूकीची तारीख ठरली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखही निश्चित झाली आहे. तत्पूर्वी महायुतीचा उमेदवार जाहीर होणार आहे. मात्र, तोपर्यंत महायुतीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी ही समन्वय बैठक होती, अशी माहिती यावेळी राजन पोकळे यांनी दिली.

सावंतवाडी टर्मिनसबाबत आम्ही देखील आग्रही आहोत. या ठिकाणी टर्मिनससोबतच रेल्वे गाड्यांना थांबे व अन्य मुद्द्यांवर देखील आम्ही सकारात्मक असून त्याबाबतच्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे. लवकरच याबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, असा विश्वास राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =