You are currently viewing वैशाली प्रभुखनोलकर यांना “उत्कृष्ट समाज पत्रकारिता पुरस्कार” प्रदान…

वैशाली प्रभुखनोलकर यांना “उत्कृष्ट समाज पत्रकारिता पुरस्कार” प्रदान…

कोल्हापूरात गौरव; धोंडू माणगावकर यांचा कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सन्मान…

सावंतवाडी

कोल्हापुर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराणी तराराणी भोसले सामाजिक विचार संमेलनात सिंधुदुर्गातील वैशाली प्रभुखनोलकर यांना पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र उत्कृष्ट समाज पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर धोंडू माणगांवकर यांना कृषि क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल, महाराष्ट्र कृषि परिवर्तन सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.परिवर्तन बहुउद्देश्यीय सेवाभावी संस्था, अखिल दशावतारी पारंपरिक लोककला अकादमी आणि एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात आले.

गुरुकृपा कैनिंग इंडस्टीचे मालक शिवराम अंकुश वारंग, (जांभरमळा) यांना कैनिंग उद्योग क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्टसमाज परिवर्तन उद्योग सेवा पुरस्कार ,तर सेन्हा मिलिंद दळवी (वेताळ बाबर्डे ) यांना ग्रामीण भागातील बचत गट स्थापन करुंन चांगले मागदर्शन केल्या बद्दल महाराष्ट्र सामाजिक सेवा पुरस्कार जेष्ठ अभिनेते आंनद काळे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले आहे. या सर्वाचेच कृषि, सामाजिक,ओद्योगिक, राजकीय, क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा