You are currently viewing दोडामार्ग-खानयाळे येथे २५ मार्चला ‘संगीत मत्सगंधा’…

दोडामार्ग-खानयाळे येथे २५ मार्चला ‘संगीत मत्सगंधा’…

दोडामार्ग

खानयाळे येथील श्री देव दाडसाखळ देवस्थानाच्या एकोणवीसाव्या वर्धापदिनानिमित्त २५ मार्चला नाट्यगंध वारखंड प्रस्तुत व विजय परब दिग्दर्शीत ‘संगीत मत्सगंधा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

वर्धापन दिनानिमित्त मंदिरात सकाळपासून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून ८ वा. श्री देव दाडसाखळवर अभिषेक, १० वा. श्री सातेरी देवी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा, ११ वा. महाआरती, तिर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, संध्याकाळी ५ वा. महादेव भजन मंडळ ओझरी सांगाव वाडा पेडणे यांचे सुश्राव्य भजन, ७ वा. ग्रामस्थांचे भजन, रात्रौ १० वा. संगीत मत्सगंधा हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी व रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खानयाळे ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 20 =