You are currently viewing शालेय विद्यार्थ्यांचे एसटी प्रवास फेरी अभावी गैरसोय; दाभोळे सरपंचांचे देवगड एस.टीला निवेदन

शालेय विद्यार्थ्यांचे एसटी प्रवास फेरी अभावी गैरसोय; दाभोळे सरपंचांचे देवगड एस.टीला निवेदन

शालेय विद्यार्थ्यांचे एसटी प्रवास फेरी अभावी गैरसोय; दाभोळे सरपंचांचे देवगड एस.टीला निवेदन

देवगड

देवगड तालुक्यातील दाभोळे गावातील शालेय विद्यार्थ्यांचे एसटी प्रवास फेरी अभावी गैरसोय होत असले बाबत चे लेखी निवेदन ग्रामपंचायत कार्यालय दाभोळे चे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी देवगड आगार व्यवस्थापक यांच्या नावे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर यांची सुपुर्द केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे देवगड एसटी आगारातून दाभोळे येथील शाळेतील मुलांकरता एसटी प्रवासी फेरी सोडण्यात येते सकाळी ७वाजून ३० मिनिटाची देवगड ते दाभोळे गणेश नगर एसटी वाहतूक ८ ऑगस्ट रोजी अचानक रद्द केली त्यामुळे देवगड व जामसंडे येथे हायस्कूल येणारे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या मुलांची गैरसोय झाली व एसटी अभावी शैक्षणिक नुकसान झाले आहे .तसेच देवगड जामसंडे येथे शिक्षणाकरता येतात त्यांना जाण्यासाठी दुपारी देवगड येथून दाभोळे येथे जाणारी १.३० वाजताची प्रवासी फेरी देखील बंद केलेली आहे.ती प्रवासी फेरी प्रवास सुरू करावी व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी. त्याचबरोबर त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी मागणी दाभोळे गावच्या शिष्टमंडळाने केली आहे .यावेळी ग्रामसेवक पांडुरंग शेटगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर लिमये, ग्रामस्थ विजय कुळकर ,राजेंद्र घाडी, संदीप अनभवणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा