You are currently viewing समज

समज

*समज*

कितीवेळा तुला सांगितलं,
एकदा फुलायचं आहेच तुला,
उगाच उमलत राहू नकोस..
दरवळ तुझ्या अंतरीचा,
गजऱ्यात सखीच्या पाहू नकोस..

कितीवेळा तुला सांगितलं,
कळी म्हणवून स्वतःला,
तू फुला आड दडू नकोस,
झोंबणार्या वाऱ्याच्या स्पर्शाने,
भांबावून कधी रडू नकोस.

कितीवेळा तुला सांगितलं,
काजव्यास चांदणी समजून,
रात्र रात्र तू जागू नकोस,
बहर चांदण्यास आला जरी,
अंधाराकडे उजेड मागू नकोस.

कितीवेळा तुला सांगितलं,
वेडे असतात पाश ते सगळे,
त्यात गुरफटून घेऊ नकोस,
सावर वेड्या हृदयाला डुबण्या,
उलट्या प्रवाहात पोहू नकोस.

✒(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − seven =