You are currently viewing कविता कुमारी विवाहिता

कविता कुमारी विवाहिता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. अध्यक्ष कवी लेखक पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कविता कुमारी विवाहिता* 

 

जी स्त्रवते विवेकातून

अवतरते शब्दातून

दिसते काव्य रूपात

ओघवती वाटते कुणाला

तर कुणाला धबधबा वाटते

कुणाला उफाळणारा सागर

तर कुणाला मंद निर्झर वाटते

ही रूपे सौ. कवितेची

सासरी, समाजात

ज्याला जसी भावली तशी

तिचा कवी पिता

फक्त तिच्याविषयी

ऐकत असतो

त्याच्या उरात ती असली

तरी हाती काहीच उरलेले नसते

जे काही संस्कार करायचे होते

ते कविता वाचकांच्या हाती

देण्याअगोदर करायचे होते

कुमारी अवस्थेत करायचे होते

ती वाचकांच्या हाती गेली

म्हणजेच सासरी गेली

परक्याचे धन झाली

म्हणून म्हणतो काव्य साधकहो, कविनो

कवितेवर संस्कार कुमारी अवस्थेत करा

एकदा का ती वाचक रुपी सासरी गेली

की आपल्या हाती काहीच रहात नाही

ती सासरी गेलेली असते.

ती वाचकांची झालेली असते.

 

*पांडुरंग कुलकर्णी*

प्रतिक्रिया व्यक्त करा