You are currently viewing स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. यायोजने अंतर्गत सिडबीने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते, त्याला सिडबी हमी देईल. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थीनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावयाची आहे.

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेवून प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसुचित जाती व नवबौध्द समाजातील उद्योजकांना 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसुचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यांनतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येतील.

सन- 2022-23 या वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता एकूण 05 पाच उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता इच्छुक लाभार्थीनी जिल्ह्याच्या संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्याकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा