You are currently viewing बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात २२ व २३ जानेवारी रोजी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार

बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात २२ व २३ जानेवारी रोजी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार

बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात २२ व २३ जानेवारी रोजी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार

बांदा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात २२ व २३ जानेवारी रोजी श्री राम आनंदोत्सव साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आल्याची माहीती आयोजनप्रमुख बांद्यातील ज्येष्ठ भजनकर्मी गिरिश महाजन व प्रकाश मिशाळ यांनी दिली.

सोमवार दि.22 रोजी श्री विठ्ठल मंदिरात सकाळी नित्यपुजा होऊन प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पुजन होईल.11 वाजता नामस्मरण व घंटानाद होईल.सायंकाळी 6 वाजता श्रीराम जय जय राम जयजय राम या मंत्राचा 5 माळा जप होईल.ठिक 7 वाजता सायंआरती होईल.त्यानंतर द्वादशीचे भजन करण्यात येईल. मंगळवारी सकाळी 9 वाजता श्री रामाचे नामस्मरण करत सर्व भजनकर्मी व रामभक्तांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करण्यात येईल.त्यानंतर श्री हनुमान मंदिरात श्रीरामनामाचा जयजयकार करण्यात येईल. त्यानंतर सर्वजण बांद्यातील संत सोहिरोबानाथ आंबिये मठात जमून अभंग,नामस्मरण व आरती करतील व परत विठ्ठल मंदिरात येऊन या सोहळ्याची सांगता होईल.या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमात सर्व भजनकर्मी,श्रावणी रामजपाचे सदस्य,महिला भजनकर्मी,ग्रामस्थ व रामभक्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन गिरिश महाजन व प्रकाश मिशाळ यांनी केले आहे. योगायोगाने मंदिरात शनिवारी श्री स्वामी समर्थ पालखी,रविवारी एकादशी व त्यानंतर दोन दिवस हा प्रभु रामचंद्रांचा कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस भाविकांना पर्वणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा