You are currently viewing तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवड, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव!

तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवड, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव!

मुंबई –

“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणानुक्रमानुसार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सभेसाठी उपस्थित भाग्यवान सभासदांना भेटवस्तू प्रदान करण्याची प्रथा भावली. प्रतिवर्षी मोठ्या संख्येने पालक आणि पाल्य यांनी उपस्थित राहून शैक्षणिक दृष्ट्या सहकार्य करावे.” असे सेवानिवृत्त महसूल अधिकारी गणपत भिवा सादये यांनी भांडुप पश्चिम पराग हायस्कूल येथे आयोजित तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्या १०१ व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सूचित केले. प्रारंभी संस्थापक कै.कृष्णाजी धोंडू सारंग पवार यांच्या प्रतिमेचे पूजन गणपत सादये, संस्थेचे अध्यक्ष विलास कुबल, ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष तुकाराम तथा नाना मोंडकर, उद्योजक अनिल राजम, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, माजी पोलीस कर्मचारी दत्तात्रय नावगे आदींच्या हस्ते करण्यात आले. गणपत सादये पुढे म्हणाले की, “आपल्या गावची जुनी संस्था तिला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. त्यासाठी नवोदित अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांनी अधिक जोमाने कार्यरत राहावे असे आवाहन केले. या प्रसंगी २०२३- २०२६ करीता नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्ष विलास वसंत कुबल, उपाध्यक्ष चंद्रकांत शांताराम कोळंबकर, चिटणीस हरिश्चंद्र आत्माराम कोचरेकर, उपचिटणीस सुबोध रामचंद्र येरम, खजिनदार दत्तात्रय विठोबा धावडे, हिशेब तपासणीस सौ. रिया राज कुबल, राजाराम मोतीराम बांदकर सभासद सौ. शर्वरी दिगंबर धावडे, सचिन पांडुरंग जोशी, सजय जोशी, सल्लागार म्हणून पांडुरंग वासुदेव पराडकर, प्रमोद पांडुरंग कांदळगावकर, गणपत भिवा सादये, प्रकाश विश्राम मोंडकर यांची निवड करण्यात आली. कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट राज वसंत कुबल यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष सिताराम नागेश तथा काका मुणगेकर, चिटणीस निलेश विठ्ठल सादये, सभासद सुनीलदत्त भगवान कोचरेकर, दत्तविजय सिताराम कुबल आदींची निवड करण्यात आली. संस्थेचे जेष्ठ सभासद प्रदिपकुमार एकनाथ सारंग यांनी संस्थेचे आद्य संस्थापक कै.कृष्णाजी धोंडू सारंग पवार यांचे वंशज म्हणून कार्यकारिणीत बिनविरोध सदस्य नियुक्त करण्यात यावे अशी मागणी करून रितसर पत्र अध्यक्ष सादये यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोना काळातील स्थिती आणि मागील जमाखर्च अहवाल वाचन चिटणीस हरिश्चंद्र कोचरेकर यांनी करून पुढील संकल्प मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सत्यवान सरवणकर, प्रदिपकुमार सारंग, मुकुंद कांदळगावकर आदींनी प्रश्न उपस्थित केले. त्याला अध्यक्ष विलास कुबल, चिटणीस हरिश्चंद्र कोचरेकर, उपचिटणीस सुबोध येरम यांनी उत्तरे दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव रोख रक्कम स्वरूपात पारितोषिके आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी वकील विषयातील एम फिल परिक्षेत यश संपादन केलेल्या ऍडव्होकेट राज कुबल यांचा अध्यक्षांच्या हस्ते विषेश सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सभेचे सूत्रसंचालन आणि आभार सुबोध येरम यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा