You are currently viewing कणकवली पर्यटन महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

कणकवली पर्यटन महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

कणकवली पर्यटन महोत्सवास उद्यापासून प्रारंभ

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे,यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार उद्घाटन

कणकवली

कणकवली पर्यटन महोत्सव 2024 या महोत्सवाचा प्रारंभ भव्य शोभा यात्रेने कणकवली पटकीदेवी येथुन विविध ढोलपथक , चित्ररथाच्या माध्यमातुन 11 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता होणार आहे. त्यानंतर या पर्यटन महोत्सवाचा उद्घाटन रात्री 9 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे, माजी आ.प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असुन त्याची पाहणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहका-यांनी केली.

पहिल्या दिवशी संगीत संध्या ‘रेट्रो टू मेट्रो’ व ‘फु बाई फु’ फेम कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे. शशांक कल्याणकर यांचा ऑर्केस्ट्रा व नामवंत ७ कलाकार असणार आहेत. फु बाई फु फेम सागर कारंडे, हेमांगी कवी यांची कॉमेडी पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता कणकवली वासीयांना या महोत्सवाची आतुरता लागून राहिली आहे. हा पर्यटन महोत्सव 11 जानेवारी ते 14 जानेवारी या काळात होत आहे. कणकवलीवासियांसाठी विविध कार्यक्रम व नामवंत कलाकार पुढील 4 दिवस मनोरंजन करणार आहेत.

पर्यटन वाढीसाठी प्रयत्न कणकवली शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक नगरी अशी कणकवलीची ओळख आहे. त्यामुळे येथील संस्कृती तसेच परमहंस भालचंद्र महाराज, कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या महनीय व्यक्तींचे कार्य लोकांसमोर पोहचावे यासाठी या पर्यटन महोत्सवाचे आयोजन आम्ही करीत आहोत. त्यामाध्यमातून पर्यटन वाढीस लागल्यास शहराचा विकासही चांगल्या प्रकारे होणार आहे,असे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा