You are currently viewing कुंभवडे ग्रा.पं. चे नूतन सदस्य विनोद कदम भाजपात….

कुंभवडे ग्रा.पं. चे नूतन सदस्य विनोद कदम भाजपात….

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश.

वैभववाडी
कुंभवडे ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य विनोद वसंत कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री. कदम सेनेच्या पॅनेलमधून निवडून आले होते. या निवडणुकीत सेनेचे 4 तर भाजपचे 3 सदस्य निवडून आले होते. ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. विनोद कदम यांनी प्रवेश केल्याने भाजपा सदस्य संख्या आता चार झाली आहे. प्रवेश करतेवेळी उदय चव्हाण, संजय चव्हाण, सचिन शिंगरे, निखील तावडे, दीपक तावडे, दीपक सावंत, दिनेश चाळके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =