You are currently viewing विकसित भारत संकल्प यात्रा आज मालवण शहरात

विकसित भारत संकल्प यात्रा आज मालवण शहरात

विकसित भारत संकल्प यात्रा आज मालवण शहरात

विविध योजनांची मिळणार माहिती व प्रत्यक्ष लाभ ; नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे पालिकेचे आवाहन

मालवण :

शासनाच्या विविध योजनांचा जनतेला लाभ देण्याच्या उद्देशाने काढण्यात येत असलेली विकसित भारत संकल्प यात्रा आज शनिवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. मालवण शहरात दाखल होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत भरड नाका येथील बाणावलीकर कंपाऊंड येथे ही गाडी उपस्थित राहणार असून आधार कार्ड अदयावत करणे, आयुष्यमान कार्ड शिबिर, पंतप्रधान स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आरोग्य शिबिर आदी योजनांची नागरीकांना माहिती व लाभ मिळवून दिला जाणार आहे. तरी याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =