You are currently viewing तुळस गावातील बीएसएनएल ग्राहक नेटवर्क समस्येमुळे त्रस्त

तुळस गावातील बीएसएनएल ग्राहक नेटवर्क समस्येमुळे त्रस्त

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावामध्ये गेल्या सात दिवसांपासून बीएसएनएल ला नेटवर्क नाही आहे. या गावात जास्तीत जास्त बीएसएनएलचे ग्राहक आहेत. सध्याच्या काळात अनेक कामं ही फोनवर अवलंबुन आहेत. उद्योग व्यवसायात सध्या मोबाईल फोन ही तर काळाची गरज आहे. असं असतांना बीएसएनएलच्या ग्राहकांना बीएसएनएलला नेटवर्क नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

वेळोवेळी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून बीएसएनएलच्या नेटवर्क समस्यांबाबत सूचना देऊनही बीएसएनएल नेटवर्क समस्या कायम असल्यामुळे आता ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अशी माहिती तुळस ग्रामपंचायत सदस्य श्री नारायण कुंभार यांनी दिली आहे. तसेच येत्या दोन दिवसात बीएसएनएल नेटवर्कसेवा सुरळीत न झाल्यास बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर मोबाईल पाण्याच्या बादलीत ठेऊन जोपर्यंत बीएसएनएल नेटवर्क सुरु होत नाही तोपर्यंत शांततेत बसून राहणार असल्याची माहिती श्री नारायण कुंभार यांनी दिली आहे. आणि जर एवढं करून ही बीएसएनएल नेटवर्क तात्काळ सुरु नाही झालं तर तुळस गावातील बीएसएनएल ग्राहकांची जास्तच जास्त बीएसएनएल सिम कार्ड एकत्र करून त्याचा एक हार बनवून बीएसएनएल कार्यालयाच्या ऑफिस मध्ये ठेऊन बीएसएनएल सिम कार्ड दिवा, अगरबत्ती आणि फुले वाहून पूजा करून बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे आगळेवेगळे आंदोलन कारण्याचा इशारा तुळस ग्रामपंचायत सदस्य श्री नारायण कुंभार यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा