You are currently viewing सावरवाड पोलीस तपासणी नाक्याच्या इमारतीस मोटारीची धडक…

सावरवाड पोलीस तपासणी नाक्याच्या इमारतीस मोटारीची धडक…

प्रवासी सुदैवाने बचावले ; मोटारीचे मोठे नुकसान…

मालवण

मालवण-कसाल मुख्य रस्त्यावरील सावरवाड पोलिस तपासणी नाक्यावरील मुख्य इमारतीस मोटारीची धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मोठ्या प्रमाणात गाडीचे नुकसान झाले आहे हा अपघात आज सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडला

कोल्हापूर येथे काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानंतर काही पर्यटक मालवण येथे आपल्या नातेवाइकांकडे आले होते. ते माघारी गोवा येथे परतत असता सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान सावरवाड पोलीस तपासणी नाक्यावरील मुख्य इमारतीस त्यांच्या गाडीची धडक बसली. गाडी इमारतीवर आदळताच चालकाचा आणि शेजारील प्रवासाचे समोरील सुरक्षा हवेचे फुगे उघडले. त्यामुळे चालकासह पुढील प्रवासी आणि आतील दोन महिला सुरक्षित बचावल्या. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =