You are currently viewing राज ठाकरे यांच्या दौऱ्या निमित्त उपरकर यांनी घेतला आढावा…

राज ठाकरे यांच्या दौऱ्या निमित्त उपरकर यांनी घेतला आढावा…

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत सुद्धा झाली चर्चा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत आहेत. तसेच ग्रामपंचायत निवडणुका १८ डिसेंबर रोजी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी शहर मध्यवर्ती कार्यालयात सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात सावंतवाडी पासून सुरू होणाऱ्या दौऱ्याचा तसेच ग्रामपंचायत निवडणुकींचा आढावा घेण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, संतोष भैरवकर, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, विभाग अध्यक्ष नाना सावंत, सचिव कौस्तुभ नाईक, उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस, शुभम सावंत, लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर, तिरोडा शाखा अध्यक्ष मनोज कांबळी, धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक, निकिता जोशी, राजा जोशी, ओमकार जोशी, रवींद्र दळवी, आकाश परब यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + two =