You are currently viewing सदगुरू श्री अवधूतानंद महाराजांची ५ डिसेंबरला पुण्यतिथी

सदगुरू श्री अवधूतानंद महाराजांची ५ डिसेंबरला पुण्यतिथी

सावंतवाडी

सदगुरू श्री अवधूतानंद महाराज यांची १५ वी पुण्यतिथी ५ डिसेंबरला अवधूत आश्रमात साजरी होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन ओम श्री सद्गुरू समर्थ अवधूतानंद महाराज सेवा मंडळ, मुंबई यांनी केले आहे.
यावेळी पहाटे ३:३० वाजता श्री लक्ष्मी नारायण व सद्गुरूंच्या पादुकांची पंचोपचार पूजा, पहाटे ५:०० वाजता श्री ची समाधीची काकड आरती, समाधीस अभ्यंगस्नान, रुद्राभिषेक व समाधी पूजन, सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहण, दुपारी १२:०० वाजता श्री ची आरती व महाप्रसाद, सायंकाळी ७:०० वाजता धूप, दीप, आरती व श्री ची पालखी असा भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी सेवा मंडळाने दिली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा