You are currently viewing लुटण्याच्या उद्देशाने “त्या” ट्रक चालकाला भोसकले?..

लुटण्याच्या उद्देशाने “त्या” ट्रक चालकाला भोसकले?..

अधिक उपचारासाठी जखमीला गोवा बांबुळीत हलविले…

सावंतवाडी
लुटण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथील त्या चालकावर अज्ञात दोघा तरुणाकडून हल्ला झाल्याचा संशय सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे.अजयकुमार श्रीपातराव पाटील (वय ४६) रा. हतकणंगले कोल्हापूर असे त्याचे नाव आहे.परिसरात असलेल्या सीसीटीव्हीत दुचाकीवरून आलेले दोघे कैद झाले आहेत. त्यामुळे तो गाडी नंबर नेमका कोणाचा याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यानंतरच त्या प्रकरणाचा नेमका उलगडा होणार आहे.अशी माहिती सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी दिली.दरम्यान या प्रकरणात जखमी झालेला पाटील याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.असे हवालदार नितीन राऊत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + nineteen =