You are currently viewing तंत्रज्ञान वापरताना त्याच्या आहारी जाऊ नका – शामराव काळे

तंत्रज्ञान वापरताना त्याच्या आहारी जाऊ नका – शामराव काळे

तंत्रज्ञान वापरताना त्याच्या आहारी जाऊ नका – शामराव काळे

सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी…

बांदा

‘आजची मुले मोबाईल, इंटरनेट सहजतेने हाताळत आहेत. एका क्लिकवर त्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते; पण हे तंत्रज्ञान वापरताना त्याच्या आहारी जाऊ नका. तंत्रज्ञानाचा चांगल्या कामांसाठीच उपयोग करा ,अन्यथा तुम्हाला होणाऱ्या गंभीर दुष्परिणांना सामोरे जावे लागेल. इंटरनेटवरच्या जाहिराती भूलथापांना बळी पडून स्वतःचे आर्थिक व मानसिक स्वरूपाचे नुकसान करून घेऊ नका. चांगल्या वाईटातून चांगले ते घ्या आणि वाईट सोडून द्या, असे आवाहन बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले.

येथील दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम प्रशालेत आयोजित केलेल्या सोशल मीडिया व सायबर गुन्हे जागरूकता कार्यक्रमात श्री काळे बोलत होते.

प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खास सोशल मीडिया व सायबर गुन्हे जागरूकता या विषयावर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट तसेच उपमुख्याध्यापक फादर रॉबिन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निरीक्षक श्री काळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, ती का घ्यावी ,सायबर गुन्हा म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार कोणते, त्याचे आपल्या जीवनावर होणारे दुष्परिणाम कोणते ,अन चुकून यात अडकलो तर पोलीस खात्याची मदत कशी घ्यावी यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन त्यांनी केले.
बांदा पंचक्रोशीत घडलेल्या अनेक घटकांचे दाखलेही त्यांनी उदाहरणादाखल दिले व याचे गांभीर्य विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे, त्याशिवाय पर्याय नाहीच ;पण हा वापर करताना आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडणार नाही याची खबरदारी घेणं आपल्याच हातात आहे, उद्याचे भावी सुजाण नागरिक बनण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य चांगल्यासाठीच वापर करा असे विचार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी काळे यांच्याशी संवाद साधत आपल्या शंकांचे निरासन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका सौ. रिना मोरजकर यांनी केले तर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट यांनी मान्यवरांचे आभार मानले.

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा