You are currently viewing व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा

व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जागतिक कीर्तीचे खेळाडू खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवून नाविन्यपूर्ण यश संपादन केल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिथुन सावंत व गावभाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. मुळीक यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक वितरण करुन गौरविण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक अशोक खोत ,उपमुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी कांबळे ,पर्यवेक्षक खराडे ,पाटील ,क्रीडा शिक्षक बरगाले ,सोनवणे ,पाटील ,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 2 =